बारावी परीक्षेत नियती जाखेटे चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:59+5:302021-07-31T04:17:59+5:30
जळगाव : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला आहे. यात रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी नियती जाखेटे ...

बारावी परीक्षेत नियती जाखेटे चमकली
जळगाव : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला आहे. यात रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी नियती जाखेटे हिने ९६.४० टक्के गुण मिळवून शहरातून चमकली आहे.
देशभरातून एकूण १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थी नियमित तर ६० हजार ४४३ विद्यार्थी खासगीरित्या नोंदणीकृत होते. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजल्यापासून ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता आला. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
००००००००००००
नियती जाखेटे ९६.४० टक्क्यांसह अव्वल (फोटो)
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यात नियती जाखेटे हिने ९६.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर द्वितीय अर्णव अग्रवाल ९५.८० टक्के तर सुयश महाजन याने ९५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील ३१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवत यश मिळविले आहे. तसेच परीक्षेत रिया बढे आणि वैष्णवी पाटील (९५), मिताली पाटील (९४.६०), जुही जावळे (९४), यश कोचर (९३.२०), अनिश गाजरे (९२.८०), नमन गोयल आणि रचना कोल्हे यांनी (९१.४०) टक्के गुण मिळवत यश मिळविले. गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विराफ पेसूना, याजवीन पेसूना व शिक्षकांतर्फे कौतुक करण्यात आले.
०००००००००००
ओरियन स्कूलमध्ये स्नेहा बनकर प्रथम (फोटो)
केसीई सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्यूनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. यंदाही शाळेने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. स्नेहा दीपक बनकर या विद्यार्थीनीने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर ९५.६० टक्के गुण मिळवत अमी शाह व मनीष भावसार या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर आदित्य जाधव या विद्यार्थ्याने ९३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सित्रा यांनी कौतुक केले आहे.
-----------------------
पोदार इंटरनॅशनल स्कूल (फोटो)
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. प्रितेश गोकुळ महाजन ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम, रोशन सिंग ९०.८० टक्के मिळून द्वितीय तर मेहुल गणेश कोळी आणि सचिन गोपाल चौधरी या विद्यार्थ्यांनी ८३ टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉ. पवन पोदार, विश्वस्त गौरव पोदार व हर्ष पोदार तसेच प्राचार्य गोकुळ महाजन, उपप्राचार्य दीपक भावसार कौतुक केले.
----------------
गोदावरी स्कूलमध्ये जितेश प्रथम (फोटो)
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यात जितेश संजय बाविस्कर या विद्यार्थ्याने ९२.८ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय रितेश अनिल पाटील ९२.४ टक्के, तृतीय प्रचेता प्रकाश मुकुंद ८९ टक्के तर चर्तुथ क्रमांक जयेश नीलेश चौधरी याने ८८ टक्के गुण मिळविले. गुणवंतांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, प्राचार्य निलीमा चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
०००००००००००००००
अद्वितीया पाटीलला ९५.८० टक्के
केंद्रीय विद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अद्वितीया निंबाजीराव पाटील ही विद्यार्थिनी ९५.८० टक्के मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. तिलक रवीकिरण वर्मा ९५.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रृष्टी दिवारे ही ९४.६० टक्के मिळवून तृतीय ठरली आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मॅथ्यू अब्राहम, ज्योती कामटे, नितीन अरसे, नीरज कलवाणी, जी.एल.अहिरवार, आर.एस.चव्हाण व विवेक सावने आदींची मार्गदर्शन लाभले.