हद्दपार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 21:54 IST2020-10-06T21:53:10+5:302020-10-06T21:54:11+5:30
जळगाव : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या गुड्डू उर्फ नईम भिस्ती याला शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. भिस्ती हा ...

हद्दपार आरोपीला अटक
जळगाव : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या गुड्डू उर्फ नईम भिस्ती याला शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. भिस्ती हा जुने बसस्थानक परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना मिळाली होती. त्यानुसार भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, अक्रम शेख, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, रतन गित्ते, तेजस मराठे व योगेश इंधाटे यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.