हद्दपारीचे उल्लंघन, चाकू घेऊन फिरणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 22:47 IST2021-03-15T22:47:11+5:302021-03-15T22:47:44+5:30
हद्दपार आरोपी चाकू घेऊन फिरत असताना सापळा रचून बाजारपेठ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

हद्दपारीचे उल्लंघन, चाकू घेऊन फिरणारा ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहरातील हद्दपार आरोपी चाकू घेऊन फिरत असताना सापळा रचून बाजारपेठ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
साहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून कुख्यात हद्दपार आरोपी कलिम शेख सलीम शेख (३०, दीनदयाळ नगर) हा १५ मार्च रोजी १२.४५ वाजता भुसावळ शहरात दीनदयाळ नगर भागात लोखंडी चाकू घेऊन हद्दपारीचे उल्लंघन करून दहशत माजवीत असताना मिळून आला. त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, साहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. रमण सुरळकर, समाधान पाटील, तुषार पाटील, रवींद्र बिऱ्हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली.