खुनाच्या गुन्ह्यातील चौघांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:23 IST2019-06-11T18:20:53+5:302019-06-11T18:23:07+5:30
नवीन बी.जे.मार्केट परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (५२, रा.हनुमान नगर, जळगाव) यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मण उर्फ राज रामभाऊ न्हावी (५५), ईश्वर भिका माळी (३४), निलेश भालचंद्र बाउस्कर (२८ तिघे रा. हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव) व सतीश आण्णा भोपाळे (४२, रा.सिध्दीविनायक शाळेच्या मागे) या चौघांची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

खुनाच्या गुन्ह्यातील चौघांची कारागृहात रवानगी
जळगाव : नवीन बी.जे.मार्केट परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (५२, रा.हनुमान नगर, जळगाव) यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मण उर्फ राज रामभाऊ न्हावी (५५), ईश्वर भिका माळी (३४), निलेश भालचंद्र बाउस्कर (२८ तिघे रा. हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव) व सतीश आण्णा भोपाळे (४२, रा.सिध्दीविनायक शाळेच्या मागे) या चौघांची मंगळवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पैशाच्या कारणावरुन चौघांनी ५ जून रोजी वासुदेव डांगे यांना मारहाण केली होती व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी चौघांना मंगळवारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.