शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

चाळीसगावला दिव्यांग थेरपी शिबिरात विविध व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 3:09 PM

दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या थेरपी शिबिरात जळगाव येथील फिजिओथेरपिस्ट डॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी मांडले.

ठळक मुद्दे४५ दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभडॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी केले मार्गदर्शन

चाळीसगाव, जि.जळगाव : दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या थेरपी शिबिरात जळगाव येथील फिजिओथेरपिस्ट डॉ.अपेक्षा शिरसाठ यांनी मांडले. शिबिर शुक्रवारी पार पडले.समग्र शिक्षा अभियान, पंचायत समिती शिक्षण विभाग, समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची शिबिरे तालुकास्तरावर आयोजित केल्या जातात. थेरपी शिबिराच्या माध्यमातून विविध व्यायाम प्रकार दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमक्ष शिकविण्यात आले. त्यासोबत पालकांचे समुपदेशनही करण्यात आले.या थेरपी शिबिराला डॉ.अपेक्षा शिरसाठ, डॉ.वृषाली वारणकर, सुवर्णा चव्हाण यांनी तपासणी करून विविध व्यायाम प्रकार शिकविले. तसेच प्रत्यक्ष थेरपी दिली.मतिमंद, वाचादोष, बहुविकलांग, सेरेब्रल पालसी, अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा या शिबिरात समावेश होता. तब्बल तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. दिवसभर चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी केले.शिबिर यशस्वीतेसाठी समावेशित तज्ज्ञ पंकज रणदिवे, श्यामकांत नेरकर, विशेष शिक्षक प्रशांत पाटील व रवींद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव