भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील वरणगाव येथील नागेश्वर मंदिराजवळून बोदवड येथे जात असताना अॅड. कडू इंगळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू काठीने प्राणघातक हल्ला करून त्यांच्याजवळील रक्कम लांबवली या निषेधार्थ भुसावळ तालुका वकील संघातर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना अज्ञात आरोपीस अटक करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.१५ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास भुसावळ वकील संघाचे सदस्य अॅड.कडू इंगळे हे दुचाकीवरून वरणगाव येथील नागेश्वर मंदिराजवळून बोदवडला त्यांच्या घरी जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांना अडवून त्यांच्यावर चाकू, काठीने प्राणघातक हल्ला केला व त्यांच्याजवळील पाच हजार रुपये लांबविले. अॅड.इंगळे यांनी विरोध करून आरडाओरड केल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा भुसाळ वकील संघातर्फे निषेध करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी निवेदन देताना वकील संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर , सचिव रमू पटेल, कोषाध्यक्ष राजेश कोळी, सहसचिव पुरुषोत्तम पाटील, महिला प्रतिनिधी जास्वंदी भंडारी, सदस्य विजय तायडे व कडू इंगळे आदी वकील बांधव उपस्थित होते.
वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरणी वकील संघातर्फे कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:21 IST
वरणगाव येथील नागेश्वर मंदिराजवळून बोदवड येथे जात असताना अॅड. कडू इंगळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू काठीने प्राणघातक हल्ला करून त्यांच्याजवळील रक्कम लांबवली या निषेधार्थ भुसावळ तालुका वकील संघातर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना अज्ञात आरोपीस अटक करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरणी वकील संघातर्फे कारवाईची मागणी
ठळक मुद्देभुसावळ येथे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदनअज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई