जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाºयांनी केली स्वबळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:23 IST2018-01-24T16:14:41+5:302018-01-24T16:23:39+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जाणून घेतली कार्यकर्त्यांची भावना

जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाºयांनी केली स्वबळाची मागणी
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२४ : जिल्ह्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षविस्तार करीत आहे. आपल्या अस्तित्वासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्या अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर केली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी ९ ते ११ या दरम्यान भुसावळ, जामनेर, चोपडा व चाळीसगाव या तालुक्यातील पदाधिकायांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, आमदार भाई जगताप, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. त्यात त्या तालुक्यातील पक्षाची सद्यस्थिती, स्वबळावर निवडणूक लढविल्यास करावे लागणारे प्रयत्न, गेल्या निवडणुकीत उमेदवाराला मिळालेले मते याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी जाणून घेतले. यासाºयात शेतकºयांची आणि विद्यार्थ्यांनी या सरकारबद्दल काय भावना आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना मिळाला का? असे प्रश्न कार्यकर्त्यांना विचारत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.