शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
3
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
4
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
5
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
6
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
7
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

वाघूरमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:23 AM

मनपाने गिरणातील पाण्यावर पुन्हा आरक्षण करावे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : वाघूर धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लाभसिंचन समितीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.समितीने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळी कापूस लागवडीसाठी दरवर्षाप्रमाणे लाभसिंचन समितीने पाण्याची मागणी केली. वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्य आहे, असे सांगितले. मात्र त्याबाबत लाभसिंचन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घ्यावी, असे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार २० मे रोजी समिती सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले. २७ मे रोजी समिती सदस्यांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे, असा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. परंतू कृषी अधिकाºयांच्यामते ३१ मेच्या आधी कापूस लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्ळामुळे मे ऐवजी १ ते ७ जून दरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले.वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रात येतअसलेल्या जळगाव, भुसावळ तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी वाघूर धरण हाच एकमेव पर्याय असल्यामुळे त्या परिसरातील लाभधारक शेतकरी पाटाला पाणी सुटणार, या भरवशावर होता. २७ मे रोजी आवर्तन सोडणे शक्य असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. मात्र ३ जून रोजी भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्य नसल्याचा अहवाल आला असल्याचे सांगितले. यावरून प्रशासन व शासन हे या धरणासाठी आपली सोन्यासारखी जमीन देणाºया श्ोतकºयांबाबत उदासीन आहे. शेतकºयांनी या धरणासाठी जमीन दिली, त्यांचे काय? असा सवाल शेतकºयांनी केला आहे.१५० दलघमीचे आवर्तन सोडासद्यस्थितीत वाघूर धरणात १२०० दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्यापैकी सिंचनासाठी केवळ १०० ते १५० दलघमी पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने प्रशासन व शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्व लाभधारक शेतकºयांनी काळ्या फितीलावून लाक्षणिक उपोषण केले. त्यात जि.प. सदस्य लालचंद पाटील, किशोर चौधरी, पं.स. सभापती यमुनाबाई रोटे, भादली विकासो चेअरमन मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी भादली बु., धनराज कोल्हे, असोदा, योगेश नारायण पाटील, नशिराबाद, बेलव्हाळ सरपंच मनिष खाचणे, निमगाव बु. सरपंच प्रियंका पाटील, बेळी सरपंच शालिनी भंगाळे, ललित बºहाटे, नशिराबाद, वराडसीम सरपंच प्रशांत खाचणे, खेमचंद महाजन यांच्यासह श्ोतकरी सहभागी झाले होते.जलसंपदाने ने निर्णय घ्यापाऊस लांबला असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. वाघूरवर जळगाव मनपासह विविध पाणीयोजनांचे आरक्षण आहे. ते आरक्षित पाणी तसेच बाष्पीभवन या सगळ्यांचा विचार करून या पाणी योजनांना १५ जुलैपर्यंत पाणी राहील, याचा विचार करून जलसंपदाविभागाने अतिरिक्त पाणी असल्यास ते शेतीला सोडायचे की नाही? याचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकाºयांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसे जलसंपदाविभागालाही कळविण्यात आले असल्याचे समजते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव