शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पेंटिंग बोर्डची मागणी घटली; पेंटर बेरोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST

वासेफ पटेल लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदीप्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याच्या ...

वासेफ पटेल

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदीप्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याच्या डिजिटल युगात मोडीत निघत आहे. शहरातील बाजारपेठेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणारे, पेंटिंग कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनेक घटकांना मदतीचा हात दिला असला तरी पेंटर मात्र अजूनही मदतीपासून वंचित आहेत.

बाजारपेठेत अनेकांनी पेंटिंग व्यवसाय सुरू केला होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून डिजिटल युग आल्याने पेंटिंग बोर्डाची मागणी घटली आहे.

शहरात पेंटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता व पेंटरनासुद्धा व्यवसाय करण्यास परवडत होते. मात्र, डिजिटल फलक, बॅनर, फ्लेक्स आल्यामुळे पेंटिंग व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातूनच काम मिळाले तरी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे पेंटिंगचा व्यवसाय सोडून दुसरे काम हाती घेणाऱ्यांची संख्या ९५ टक्के असल्याचे विदारक चित्र प्रभाकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. पेंटरांनाही शासनाने मदत देण्याची गरज आहे.

कोरोनाचाही बसला फटका

पेंटिंग करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने शहरातील अनेक पेंटर हे दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. तसेच मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमध्ये पेंटिंगची मागणी घटली आहे.

पुन्हा ‘अच्छे दिन’ची आशा

डिजिटल बोर्ड आकर्षक व स्वस्त असले तरी त्यांचे आयुष्य कमी आहे. पेंटर जे बोर्ड हाताने रेखाटतात ते चिरकाल टिकून राहतात, मात्र लोकांना हे कळत नाही. आज ना उद्या लोकांना हे कळेल आणि पुन्हा आमच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास पेंटरनी व्यक्त केला.