गावठी ते गावठीच ऱ्हास भो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:14+5:302021-09-12T04:21:14+5:30
जिल्ह्यातील एका नदीवर बंधारा बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. हे काम सदोष असल्याने खिडक्यांमधील गॅप व इतर दोषांमुळे ...

गावठी ते गावठीच ऱ्हास भो
जिल्ह्यातील एका नदीवर बंधारा बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. हे काम सदोष असल्याने खिडक्यांमधील गॅप व इतर दोषांमुळे अडविलेले पाणी वाहून गेले. दुसऱ्या धरणातील पाणी या बंधाऱ्यात सोडण्यात आले... आता खरा प्रश्न होता तो वाहून जाणारे पाणी अडवायचे कसे ?
हा प्रश्न प्रशासनासोबत आजूबाजूच्या जनतेसमोरही होता. नुकताच बंधारा बांधला आहे म्हणून दुरुस्तीला पैसे मिळणार नाही, दुरुस्तीसाठी मंजुरी, अंदाजपत्रक, निधीची तरतूद या बाबी वेळखाऊ आणि चालूच उपयोगी पडणाऱ्या नव्हत्या. पाणी तर आताच अडविले पाहिजे, यासाठी परिसरातील लोकांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडे समस्या मांडली आणि त्यांनी गावठी जुगाड तंत्रज्ञान अमलात आणायचे सांगून त्याचा खर्चही दिला. सुती गोणपाट, खारट चिकनमाती यांचा लगदा, पेस्ट करून तिला खिडक्यांच्या गॅपमध्ये ठासून ठासून दाबल्याने बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबली. ऐन वेळेवर गावठी तंत्रज्ञानाने गरज भागली आणि चक्क पाणी गळती थांबल्याने मग सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला... शेवटी शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगली गावठी ते गावठीच ऱ्हास भो...
_ संजय पाटील