शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणा:यांवर गुन्हा

By admin | Updated: March 13, 2017 01:05 IST

अमळनेर : न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

अमळनेर : विधवा  महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणा:या आणि सोशल मीडियावर त्या महिलेचे फोटो टाकून बदनामी करून धमकी देणारा तरुण आणि  25 ते 30 जणांवर अमळनेर पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील आठवडे बाजारात राहणा:या एका 35 वर्षीय विधवा महिलेस लक्ष्मण उर्फ पप्पू महाजन (वय 40, रा. शारदा कॉलनी) याने लग्नाचे आमिष आणि मुलांचे पालन पोषणाचे आमिष दाखवून 16 ऑगस्ट 2012 ते 10 मार्च 2017 दरम्यान नाशिक तसेच अमळनेर येथे  वेळोवेळी बलात्कार केला. तसेच धाक दाखवला. तर राहुल महाजन (35) याने व   एका  ग्रुपवरील  25  ते 30 सदस्यांनी त्या महिलेचे ईल फोटो प्रसिद्ध करून शिवीगाळ व दमदाटी केली, अशा आशयाची तक्रार महिलेने न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने कलम 156 (3) प्रमाणे तीन दिवसात चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून लक्ष्मण महाजन, राहुल महाजन यांच्यासह  सोशल मीडिया ग्रुपच्या 25 ते 30 सदस्यांवर  भादंवि कलम 376, 354, 417, 504, 506, 500, 34 प्रमाणे बलात्कार, मारहाणीची धमकी, बदनामी तसेच सायबर क्राईम 66 (ई) व 67 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे करीत आहेत.                            (वार्ताहर)