सोशल मीडियावर बदनामी, २५ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:05+5:302021-09-12T04:21:05+5:30

सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून २०१९ ते २०२१ (ऑगस्टपर्यंत) सायबर पोलिसात २५ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी चालू वर्षाच्या ...

Defamation on social media, 25 cases filed | सोशल मीडियावर बदनामी, २५ गुन्हे दाखल

सोशल मीडियावर बदनामी, २५ गुन्हे दाखल

सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून २०१९ ते २०२१ (ऑगस्टपर्यंत) सायबर पोलिसात २५ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी चालू वर्षाच्या आठ महिन्यात दहा गुन्हे दाखल झालेले आहेत. एकूण दाखलपैकी ८ गुन्हे पोलिसांनी उघड केले असून संबंधितांवर अटकेची कारवाई झालेली आहे. एका प्रकरणात अटक झालेली व्यक्ती तर शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावरील आहे.

मुलींनो डीपी सांभाळा.....

मुलींनी शक्यतो व्हाॅट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मीडिया साईटवर डीपी ठेवताना स्वत: फोटो ठेवू नये. या फोटोचा गैरवापर होण्याचा मोठा धोका असतो. असे प्रकार जिल्ह्यात याआधी घडलेले आहेत. मुलींचे फोटो पाहून अनोळखी व्यक्ती संवाद साधण्याचा प्रयत्न करून सलगी वाढविण्याचा प्रयत्न करतो. त्यातून अनेक मुली समोरील व्यक्तीला बळी पडल्या असून त्यात त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे मुलींकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. यात बदनामी झालेली असते तो भाग वेगळाच. त्यासाठी डीपी ठेवूच नये, ठेवायचा झाला तर फक्त ओळखीच्याच लोकांना तो दिसेल तशी सेटिंग करता येते.

अशी घ्या काळजी...

-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूजर्स आपले करंट लोकेशन शेअर करत असतात. मात्र, असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही बाहेर फिरायला गेला आहात व तेथील लोकेशन टाकून पोस्ट शेअर केल्यास तुमच्या घरी कोणी नाही, अशी माहिती पसरते. यामुळे अनेक प्रकारचा धोका होऊ शकतो. त्यामुळे तुमचे करंट लोकेशन शेअर करणे टाळावे.

-फेसबुक अथवा ट्विटरवर गैर-वैद्यकीय औषधांपासून मादक पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आहे. सोबतच शस्त्र खरेदी-विक्रीवरदेखील बंदी आहे. यूजर्सने अशा पोस्ट शेअर केल्यास अकाउंट ब्लॉक होते व कारवाईदेखील केली जाते.

-काही व्यक्ती राजकीय, धार्मिक अथवा आंतरराष्ट्रीय संघटनेला घाबरवणे किंवा हिंसक गोष्टीत सहभागी असतात. असे प्रकार आढळल्यास अशा यूजर्सवर बंदी घातली जाते व अकाउंट डिलीट केले जाते. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही पोस्ट शेअर करू नयेत. मोबाइल तसेच सोशल मीडियाच्या प्रत्येक साईटवर सेटिंग करता येते. त्याचा वापर करावा.

कोट....

तंत्रज्ञान खूप पुढे गेलेले आहे. क्षणीक अजिबात लोभाला बळी पडू नये. ओटीपी तर मुळीच कोणाला देऊ नये. महिला व मुलींनी याबाबत विशेष दक्ष असणे गरजेचे आहे. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे गुन्हाच असून अशी व्यक्ती थेट कारागृहातच जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सोशल मीडियाचा वापर जपूनच करावा.

-लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Defamation on social media, 25 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.