पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:57 IST2018-10-05T12:56:29+5:302018-10-05T12:57:11+5:30
कॉँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रेदरम्यान जळगावात साधला संवाद

पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका
जळगाव : पेट्रोल भावातील घट ही शासनाची केवळ बनवाबनवी असल्याची टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी जळगावात केली. पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आणले तरच काही फरक पडू शकतो अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कॉँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा शुक्रवारी जळगावात होती. यात्रेनिमित्ताने शहरातील बुद्धीवंतांशी खासदार अशोक चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते
ही जनसंघर्ष यात्रा जळगावातील बुद्धीवंतांशी संवाद साधल्यानंतर एरंडोलकडे रवाना झाली. एरंडोल येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा होणार आहे. त्यानंतर पारोळा, अमळनेर येथे यात्रा पोहचेल. तेथून धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्याकडे यात्रा रवाना होणार आहे.