जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:46+5:302021-02-05T05:52:46+5:30

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा फायदा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ४५४ शेतकऱ्यांनी घेतला आहे. ...

Debt relief scheme benefits 1.5 lakh farmers in the district | जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा

जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा फायदा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ४५४ शेतकऱ्यांनी घेतला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात १ लाख ६० हजार ६२४ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना ८९६.३५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे.

थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.

या योजनेत आतापर्यंत १ लाख ७४ हजार ४५४ कर्जखाती अपलोड करण्या आली आहे. त्यातील आधार प्रमाणिकरण झालेल्या खात्यांचा आकडा १ लाख ६० हजार ६२४ एवढा आहे. त्यातील १ लाख ५७ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम मिळाली आहे.

सध्या काही खात्यांची तक्रार सुरू आहे. त्याची तहसीलदारांकडे निवारणासाठी प्रलंबित खाती २१६ एवढी आहे.

Web Title: Debt relief scheme benefits 1.5 lakh farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.