शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कर्जमुक्ती करून आमदार सुरेश भोळेंनी केले आश्वासन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:51 AM

आर्थिक अडचणी दूर झाल्याने विकासाला येणार गती : भुयारी गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात

जळगाव : अनेक वर्षांपासून हुडको व जिल्हा बॅँकेच्या कर्जाच्या जाचात अडकलेली महापालिका कर्जातून मुक्त झाल्यामुळे आता नागरिकांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द पाळला आणि आमदार सुरेश भोळे यांनी मनपा कर्जमुक्त करण्याचे आश्वासन पूर्ण केले. शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून शहराच्या विकासाला नवी गती येणार असल्याचे सकारात्मक चित्र सध्या पहायला मिळत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅँकेचे कर्ज होते. हुडकोच्या १४१ कोटीच्या बदल्यात ३७४ कोटी तर जिल्हा बॅँकेच्या ५९ कोटी रुपयांच्या बदल्यात १४१ कोटी रुपये मनपाने भरले होते. अनेक वर्षांपासून हे कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडूनही प्रयत्न करण्यात आले. पाच वर्षापुर्वी आमदार सुरेश भोळे पहिल्यांदाच शहराचे आमदार झाल्यानंतर मनपा कर्जमुक्तीचा संकल्प केला होता. पाच वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून दोन आठवड्यांपुर्वीच मनपाला जिल्हा बॅँकेच्या कर्जातून मुक्त केले. त्यानंतर राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करत हुडकोचा कर्जाचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. आमदार भोळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवित हुडकोचे संपूर्ण कर्ज एकत्रितरित्या शासनातर्फे भरण्याची तयारी दर्शविली. कर्जापासून मनपाची मुक्तता झाल्यामुळे आता मालमत्ता कर स्वरुपात येणारी रक्कम असो या सर्व रक्कमेतून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.४२ कोटींच्या कामांना होईल सुरुवातमुख्यमंत्र्यांनी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी जाहीर केलेल्या १०० कोटींपैकी मंजूर झालेल्या ४२ कोटींमधून होणाºया १३० कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांचे देखील भाग्य उजाडणार आहे. तसेच उर्वरित ५८ कोटी रुपयांमधून पाठविण्यात आलेल्या कामांना देखील मंजुरी मिळणार आहे. बुधवारी महापौर सीमा भोळे यांनी अहमदाबाद येथील कंत्राटदाराला काम सुरु करण्यासाठीचे कार्यादेश दिले.पाच वर्षात ८९१ कोटींचा मिळाला निधीआमदार भोळे यांनी आपल्या पाच वर्षात शहराला कधीही न मिळालेला इतका निधी शासनाकडून आणला असून, पाच वर्षात अमृत पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी तब्बल ४५० कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी ३० कोटी, समांतर रस्त्यांसाठी ६९ कोटी, पोलीस हाउंसींग सोसायटीसाठी ७० कोटी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिवाजी नगरउड्डाणपुल व पिंप्राळा रेल्वेपूलसाटी ९५ कोटी, नगरोथ्थान अंतर्गत शहरातील विकासकामांसाठी १०० कोटींसह एकूण ८९१ कोटी रुपयांचा शहरासाठी आमदार सुरेश भोळे यांनी आणला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव