मोर धरणाजवळ विहिरीचे काम करीत असताना तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:40 IST2018-06-26T12:38:54+5:302018-06-26T12:40:00+5:30

मोर धरणाजवळ विहिरीचे काम करीत असताना तरुणाचा मृत्यू
फैजपूर / हिंगोणा, जि. जळगाव - यावल तालुक्यातील मोर धरणाजवळ विहिरीचे काम करीत असताना कोमल वसंत वारके (३८) या काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
मोर धरणाजवळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची विहीर असून त्या ठिकाणी केबल व पंपाचे काम सुरू होते. त्या वेळी तेथे कोमल वारके हेदेखील काम करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. वारके यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नसून पोलीस तपास सुरू आहे.