बोदर्डे येथे तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:30 IST2019-03-27T22:30:10+5:302019-03-27T22:30:29+5:30

लग्न समारंभात स्वयंपाकीचे काम

Death of a youth by electric torch at Bodhda | बोदर्डे येथे तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू

बोदर्डे येथे तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू

पारोळा : तालुक्यातील बोदर्डे येथे विजेचा धक्का लागून गौतम रावण सैंदाणे (३०) यांचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम सैंदाणे हे लग्न समारंभात स्वयंपाकीचे काम करतात. बुधवारी ते एका लग्नातून स्वयंपाक आटोपून बोदर्डे गावी आले. त्यांनी त्यांच्या पत्राच्या घरात आंघोळ करून चहा पाणी घेत इलेक्ट्रिक बोर्डात पिन लावत असताना त्यांना विजेचा धक्का लागून ते फेकल्या गेले. त्यात ते जागीच गतप्राण झाले.
याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला पोलीस पाटीलांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे तपास करीत आहेत.

Web Title: Death of a youth by electric torch at Bodhda

टॅग्स :Jalgaonजळगाव