अतिमद्य सेवनामुळे तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:07 IST2021-01-19T22:07:22+5:302021-01-19T22:07:22+5:30
जळगाव : अतिमद्य सेवनामुळे समतानगरातील तरूणाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ...

अतिमद्य सेवनामुळे तरूणाचा मृत्यू
जळगाव : अतिमद्य सेवनामुळे समतानगरातील तरूणाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र हरी जगताप (३२) असे मयताचे नाव आहे. रवींद्र हा समतानगरात कुटूंबियांसह वास्तव्यास होता़ दारूचे व्यसन असल्यामुळे त्याला यकृताची व्याधी होती. मंगळवारी सकाळी त्याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यास कु टूंबियांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. अतिमद्य सेवनामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी सीएमओ डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.