दोंदवाडा येथे शेततळ्यात पोहताना युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:00 IST2019-06-24T17:59:34+5:302019-06-24T18:00:10+5:30
दोंदवाडा परीसरात हळहळ

दोंदवाडा येथे शेततळ्यात पोहताना युवकाचा मृत्यू
पहूर ता जामनेर : दोंदवाडा येथील अतुल श्रावण बडगुजर (वय २०) हा शेततळ्यात पोहत असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना सोमवारी दुपारी घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अतुल हा दोंदवाडा शिवारातील एका शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान अतुल पाण्यात बुडाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी मयत अतुल चे मावसा नामदेव प्रभाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने दोंदवाडा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.