विषबाधा झालेल्या शिरसोलीच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 14:26 IST2020-09-22T14:25:46+5:302020-09-22T14:26:01+5:30
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवारात शेतात कपाशीवर फवारणी करीत असताना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुण शेतकरी ...

विषबाधा झालेल्या शिरसोलीच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवारात शेतात कपाशीवर फवारणी करीत असताना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुण शेतकरी अशोक उर्फ बुधा एकनाथ पाटील (३६) यांना विषबाधा झाली. प्रकृती गंभीर झाल्यामुळे मंगळवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास त्या तरूण शेतकर-याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.
अशोक उर्फ बुधा एकनाथ पाटील हे सोमवारी शिरसोली शिवारातील नेव्हरे शिवारातील शेतात कपाशीवर फवारणी करीत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास विषारी औषधांची बाधा झाल्यामुळे प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी लागलीच उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ७.३० वाजता उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशोक पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी १२ वाजता आणण्यात आला होता.