मेथीच्या भाजीतून विषबाधा झाल्याने जळगावात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:01 IST2018-12-03T17:59:06+5:302018-12-03T18:01:10+5:30

मेथीची विना शिजवलेली भाजी खाल्ल्याने विषबाधा होवून अंजुबाई रामा पाटील (४५, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

Death of woman in Jalgaon due to poisoning of fenugreek | मेथीच्या भाजीतून विषबाधा झाल्याने जळगावात महिलेचा मृत्यू

मेथीच्या भाजीतून विषबाधा झाल्याने जळगावात महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देमहिलांसोबत शेतातील मेथीची भाजी खाल्लीरात्री उलट्या सुरु झाल्याने केले जिल्हा रुग्णालयात दाखलशेतातील मेथीवर केली होती किटकनाशकाची फवारणी

जळगाव : मेथीची विना शिजवलेली भाजी खाल्ल्याने विषबाधा होवून अंजुबाई रामा पाटील (४५, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंजुबाई या मजुरीचे काम करतात. शनिवारी त्या शेतात कामाला गेल्या होत्या. तेथे महिलांसोबत त्यांनी शेतात लावलेली मेथीची भाजी खाल्ली. त्यानंतर सायंकाळीही ही भाजी खाल्ली त्यानंतर जेवण करुन झोपल्या. रात्रीतून उलट्या व शौचास होऊ लागल्याने रविवारी सकाळी दहा वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. शेतातील मेथीवर किटकनाशकाची फवारणी केली होती असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Death of woman in Jalgaon due to poisoning of fenugreek