निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST2021-04-11T04:16:41+5:302021-04-11T04:16:41+5:30

जळगाव : रवींद्र जोशी (विधाते) ( ६५, रा.इंदौर) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : रवींद्र जोशी (विधाते) ( ६५, रा.इंदौर) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. प्रमोद जोशी यांचे ते व्याही होत.

--

सुवर्णा धुमाळ

जळगाव : सुवर्णा धुमाळ (४३) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नगरपालिका कर्मचारी सुनील धुमाळ यांच्या त्या स्नुषा होत.

---

चंद्रकांत महाजन

जळगाव : नगररचना महाराष्ट्र राज्यचे सेवानिवृत्त उपसंचालक चंद्रकांत महाजन (८०, रा.दीनानाथ वाडी, रिंगरोड) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

--

एकनाथ चौधरी

जळगाव : श्रीकृष्ण लॉन्सचे संचालक एकनाथ चौधरी (नांदेडकर) (८१) यांचे नाशिक येथे हृदयविकारामुळे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

--

चंद्रकांत राणे

जळगाव : रुबी सर्जिकल एलाइट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक चंद्रकांत राणे (७७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केतन राणे यांचे ते वडील होत.

--

रेशमाबाई पाटील

ममुराबाद : रेशमाबाई सखाराम पाटील (९२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश पाटील यांच्या त्या आई होत.

--

राजेंद्र साळुंखे

जळगाव : राजेंद्र साळुंखे (५३, रा.व्यंकटेशनगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, जावई असा परिवार आहे.

--

प्रकाश सपकाळे

जळगाव : एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश सपकाळे (रा. हरिविठ्ठलनगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

कलाबाई बिढे

जळगाव : कलाबाई बिढे (६६, रा.ज्ञानदेवनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथील कर्मचारी दीपक बिढे यांच्या त्या आई होत.

--

वैशाली भंगाळे

जळगाव : वैशाली भंगाळे (४५, रा.अयोध्यानगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. दिलीप भंगाळे यांच्या त्या पत्नी होत.

--

देविकाबाई सांखला

जळगाव : देविकाबाई सांखला (८९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश सांखला यांच्या त्या आई होत.

--

इंदुमती चौधरी

जळगाव : इंदुमती चौधरी (५९, रा.सर्वोत्तमनगर, सिंधी कॉलनी रोड) यांचे शनिवारी निधन झाले. पांडुरंग चौधरी यांच्या त्या पत्नी होत.

--

प्रल्हाद सराफ

जळगाव : प्रल्हाद सराफ (९०, रा.फैजपूर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गिरीश सराफ यांचे ते वडील होत.

--

रामपरीक्षण यादव

जळगाव : रामपरीक्षण यादव (७५) यांचे शुक्रवारी निधन झाले.

--

अर्चना जोशी

चोपडा : बोदवड येथील न.ह. राका शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अर्चना

जोशी (७४, जोशी वाडा, दीपमाळजवळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, नातू, पुतण्या असा परिवार आहे. त्या अशोक जोशी यांच्या पत्नी होत.

--

प्रकाश हिवरकर

जळगाव : प्रकाश हिवरकर (रा. डॉ. झाकीर हुसेन हौसिंग सोसायटी) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

--

भाऊलाल पाटील

जळगाव : भाऊलाल पाटील (८६) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे. रवी फोटो स्टुडिओचे

संचालक शिवाजी पाटील यांचे ते वडील होत.

--

रामदास पाटील

जळगाव : जि.प. शाळा, वडलीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास पाटील (८२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक विनायक पाटील यांचे ते वडील होत.

--

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.