वाटेतच 'त्या' गर्भवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:24 IST2019-05-15T23:24:02+5:302019-05-15T23:24:50+5:30
जळगाव - प्रसुती वेदना असह्य झाल्याने मिनाबाई बारेला (१८, रा. भादली बुद्रुक ता. जळगाव ) या गर्भवती महिलेचा वाटेतच ...

वाटेतच 'त्या' गर्भवतीचा मृत्यू
जळगाव- प्रसुती वेदना असह्य झाल्याने मिनाबाई बारेला (१८, रा. भादली बुद्रुक ता. जळगाव) या गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७़४५ वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
भादली खु़ येथील मिनाबाई बारेला ही महिला गर्भवती होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने रात्रीपासून तिची प्रकृती खालावली होती. बुधवारी सकाळी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. गर्भवती महिलेच्या मृत्यूपूर्वीच बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता. दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.