शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

चहार्डी येथे मृत्यू एकाचा अन् रडारड दुसऱ्यांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:41 IST

चहार्डीच्या खदानातील ‘तो’ मृतदेह विजय दशरथ भिल (वय ३५) याचा नसून, निर्मल नामसिंग बारेला (वय २५) याचा असल्याचे तपासात आढळले.

ठळक मुद्देखदानातील ‘तो’ मृतदेह विजय भिल्ल याचा नसून, निर्मल बारेला याचा असल्याचे निष्पन्नअंत्ययात्रेसाठी आलेले नातेवाईक परतले

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : चहार्डीच्या खदानातील ‘तो’ मृतदेह विजय दशरथ भिल (वय ३५) याचा नसून, निर्मल नामसिंग बारेला (वय २५) याचा असल्याचे तपासात आढळले. मात्र याआधी रडारड भिल्लच्या नातेवाईकांनी केली.तालुक्यातील चहार्डी येथे दि.२८ रोजी शासकीय गट नंबर असलेल्या खदानीत एक मृतदेह आढळला होता. सदर मृतदेह विजय भिल यांचाच असल्याचे त्याचा भाऊ संजय भिल सांगत असल्याने संजय भिल यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसात विजय भिल यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली होती. विजय भिल यांच्या नातेवाईकांना अंत्ययात्रेचे भ्रमणध्वनीवरून कळविण्यातही आले होते. तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी रडारडही सुरू केलेली होती. तसेच दि.२९ रोजी पोलीस दप्तरी नोंद असल्याप्रमाणे ‘लोकमत’मध्ये विजय दशरथ भिल याचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू असे वृत्त छापून आले होते.सदर मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खदानीच्या पाण्यात पडला असल्याने फुगून वर आला होता. त्याचे शवविच्छेदनासाठी चोपडा येथे आणणे अवघड असल्याने जागेवरच चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वाल्मीक पाटील यांनी शवविच्छेदन केले होते. मात्र सदर मृतदेह विजय दशरथ भिल यांचाच असल्याचे त्याचा भाऊ संजय शर्विल याने चोपडा शहर पोलिसात खबर दिली होती. त्यानुसार चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. परंतु त्यानंतर मात्र चहार्डी निमगव्हाण रस्त्यालगत शेतात वास्तव्य करून राहत असलेला मोहन रामसिंग बारेला (३०) याने सदर मृतदेह माझा भाऊ निर्मल नामसिंग बारेला याचाच असल्याचा दावा केला. त्यानंतर मात्र पोलिसांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची खबर देणारा संजय भिल व त्यांच्या नातेवाईकांना सांगितले की, तुमचा नातेवाईक आणि संजयचा भाऊ विजयादशमी हा कुठे कुठे कामाला होता. त्या ठिकाणी तुम्ही त्याचा शोध घ्या. याच्यात जवळपास चार ते पाच तास निघून गेले आणि रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान विजय दशरथ भिल हा अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे शेळ्या चारण्याचे काम करीत असल्याचे समजल्याने तेथून विजय दशरथ भिल याला त्याच्या नातेवाईकांनी चहार्डी येथे जिवंत आणल्याने पोलिसांसमोर तो उभा ठाकला. त्यानंतर पोलिसांनी मात्र पुन्हा खात्री करण्यासाठी मयत निर्मल नामसिंग बारेला याची पत्नी गीताबाई निर्मल बारेला हिला मृतदेहाची ओळख करण्यासाठी घटनास्थळी आणले. त्यानंतर गीताबाई बारेला हिने निर्मल बारेला यांच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली असून, टाके पडल्यासारखे खुण होती. त्याप्रमाणे दिसून आल्याने पोलिसांनी मात्र अखेर सदर मृतदेह निर्मल नामसिंग बारेला यांचाच असल्याचे पोलीस दप्तरी पूर्वीच्या नोंदमध्ये बदल करून व दुरुस्त करून नोंद बदलविण्यात आली. मात्र खबर देणार हा संजय दशरथ भिल हाच कायम ठेवला असून, तपास पोलीस कर्मचारी मधुकर नामदेव पवार करीत आहे.खदानीतून मृतदेह बाहेर काढल्यापासून ते रात्री साडेदहा अकरा वाजेपर्यंत विजय भिल यांच्या नातेवाइकांनी मात्र चांगलीच रडारड केली असून, दि.२९ रोजी चहार्डी येथे जिवंत असलेल्या विजय दशरथ भिल यांची अंत्ययात्रा असल्याचा नातेवाईकांना निरोपही देण्यात आला होता. अखेर रात्री उशिरा पुन्हा नातेवाईकांना या घटनेबाबत कळवण्यात आले व विजय भिल हा जिवंत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूChopdaचोपडा