जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 20:22 IST2023-06-20T20:21:54+5:302023-06-20T20:22:11+5:30

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली.

death of Jain Sadhvi Anant kirtisreeji Maharaj | जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण

जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण

जी.टी. टाक 

कळमसरे  (जि.जळगाव) : जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज (वय ७३) यांचे मंगळवार २० रोजी दुपारी अहमदाबाद येथे निर्वाण झाले.
कळमसरे (ता.अमळनेर ) येथील नेमिचंद मिश्रीलाल कोठारी परिवारात सन १९५२ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली.  देशभरात त्यांच्या १४० शिष्या आहेत.

बुधवार २१ रोजी सकाळी ९ वा.जैन सोसायटी अहमदाबाद येथून त्यांची पालखी निघेल. कोठारी परिवाराचे सदस्य व जैन बांधव मोठया संख्येने अमळनेर येथून अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. कोठारी परिवारात आतापर्यंत २७ जणांनी जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. कळमसरे हायस्कूलचे चेअरमन महेंद्रलाल, विनोद आणि राजेश कोठारी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.

Web Title: death of Jain Sadhvi Anant kirtisreeji Maharaj

टॅग्स :Jalgaonजळगाव