मोटरसायकल घसरुन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:14 IST2019-04-05T19:13:40+5:302019-04-05T19:14:02+5:30

बोरनारमध्ये शोककळा: कजगाव- कनशी मार्गावरील दुर्घटना

The death of a motorcycle collapses | मोटरसायकल घसरुन तरुणाचा मृत्यू

मोटरसायकल घसरुन तरुणाचा मृत्यू


कजगाव, ता.भडगाव: येथुन जवळच असलेल्या बोरनार ता.भडगाव येथील रहिवासी गणेश भीमराव महाजन (वय २६ ) यांचा ५ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान कजगाव- कनाशी मार्गावर मोटारसायकल घसरल्याने अपघाती मृत्यु झाला. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे
या दुर्घटनेबाबत वृत्त असे की, बोरनार ता.भडगाव येथील गणेश महाजन हे बोरनार येथुन कजगाव येथे कामानिमित्त येत असताना कजगाव पासुन दिड किलोमीटर अंतरावर कजगाव -कनाशी मार्गावर लहान पुला जवळ त्यांचा मोटरसायकल (क्रमांक एम.एच.१९ /ए. व्ही. २६८९) वरील ताबा सुटल्याने मोटरसायकल घसरल्याने ते रस्त्यावर पडले व डोक्यास मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर वार्ता गावात पोहचताच गावात शोककळा पसरली आहे. गणेश महाजन यांचे पश्चात आई,वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. ते बोरनारचे सरपंच पी.डी. माळी यांचे पुतणे होत

Web Title: The death of a motorcycle collapses

टॅग्स :Accidentअपघात