जळगावात दोन दुचाकींच्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:16 IST2018-02-16T13:14:06+5:302018-02-16T13:16:08+5:30
शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेची घटनेत तीनजण गंभीर जखमी

जळगावात दोन दुचाकींच्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६ : शहरातील औरंगाबाद मार्गावर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास रॉयल फर्निचर समोर भरधाव वेगाने येणाºया दोन मोटार सायकलींची समोरा-समोर झालेल्या धडकेत लैलेश अविनाश चौधरी (वय.२०, रा.शंकरराव नगर) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकावर जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवाारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद मार्गावर एमआयडीसीतील कंपनीतून आपले काम आटोपून लैलेश चौधरी आपल्या मोटारसायकलवर (एम.एच.१९,बी.एच.१८०४) एकटाच घराकडे निघाला. मात्र काही अंतर पार केल्यानंतर रॉयल फर्निचर समोर कुसुंबाकडे जाणाºया दुसºया मोटारसायकलने (एम.एच.१९, बी.एफ.६६७०) समोरा-समोर धडक दिली. कुसुंबाकडे जाणाºया मोटारसायकलवर तीन युवक स्वार होते. अपघातात लैलेश चौधरीच्या तोंडाला व छातीवर जबर मार बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसºया दुचाकीवरील पंकज मधुकर जाधव (वय १८, रा.कुसुंबा), राहुल वाघ (वय २०, रा.कुसुंबा) विकी साबळे (वय २२,रा.फत्तेपुर) या तिघांच्याही मान व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर एम.आय.डी.सी. परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विकी व पंकज या युवकांना मार बसल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असले.