अचानक प्रकृती खालावल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:50 IST2020-05-23T20:50:38+5:302020-05-23T20:50:47+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अडकलेला मजूर वर्ग हा आपल्या गावाकडे निघाला आहे़ रेल्वे प्रशासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू ...

Death of a laborer due to sudden deterioration of health | अचानक प्रकृती खालावल्याने मजुराचा मृत्यू

अचानक प्रकृती खालावल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अडकलेला मजूर वर्ग हा आपल्या गावाकडे निघाला आहे़ रेल्वे प्रशासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू केली आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मध्यप्रदेशातील प्रतापगड येथील मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली.
मुंबईहून प्रवास करणारा तरुण रामकुमार प्यारेलाल निर्मल (२६, रा.पुरे टिकाराम, जि.प्रतापगड, मध्यप्रदेश) याची प्रकृती अचानक खालावली होती. त्याला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरविण्यात येऊन जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना २२ रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हवालदार अनिंद्र नगराळे करीत आहे़

Web Title: Death of a laborer due to sudden deterioration of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.