विजेच्या धक्क्याने आव्हाणे येथील वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2017 17:25 IST2017-06-08T17:25:09+5:302017-06-08T17:25:09+5:30
सुमनबाई रमण पाटील या वृध्देस विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या खांबाला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता आव्हाणे येथे घडली.

विजेच्या धक्क्याने आव्हाणे येथील वृद्धेचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेलेल्या सुमनबाई रमण पाटील (वय 65) या वृध्देस विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या खांबाला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता आव्हाणे (ता.जळगाव) येथे घडली. गावात गेल्या 14 तासापासून वीज पुरवठा बंद आहे. गुरुवारी विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला. घरातील साफसफाई झाल्यानंतर सुमनबाई या खांबाजवळच कचरा टाकायला गेल्या होत्या. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा हा बळी असल्याचा आरोप गावक:यांनी केला.
सुमनबाई यांचे पती रमण पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा विलास आणि कैलास हे खासगी वाहनावर चालक आहेत. ही घटना तसेच वीज पुरवठय़ाबाबत महावितरण कंपनीशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे गावक:यांनी सांगितले.