जळगावात रेल्वेखाली आल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2017 17:35 IST2017-06-08T17:35:33+5:302017-06-08T17:35:33+5:30
धावत्या रेल्वेखाली आल्याने राजेंद्र गंगाराम पाटील (वय 35,रा.खंडेराव नगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

जळगावात रेल्वेखाली आल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.8 - धावत्या रेल्वेखाली आल्याने राजेंद्र गंगाराम पाटील (वय 35,रा.खंडेराव नगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. राजेंद्र हा रिक्षा चालक असून गुरुवारी सकाळी त्याची ओळख पटली.
राजेंद्र हा खंडेराव नगरातील रहिवासी असून रिक्षा चालक म्हणून तो काम करतो. रेल्वेखांबा क्र. 417 ते 422 दरम्यान बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला आहे. घटना समजल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. खंडेरावनगर परिसरातील रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेचा त्याला धक्का लागला असावा असे सांगितले जात असले तरी ही आत्महत्या की घातपात याबाबत पोलीस चौकशी करीत आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.