पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

By Admin | Updated: December 22, 2015 00:42 IST2015-12-22T00:42:51+5:302015-12-22T00:42:51+5:30

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त

'Deadline' for water scheme in March! | पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला निधी जर मार्चअखेर खर्च झाला नाही, तर पुढील हप्ता मिळणार नसल्याची माहिती आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी दिली़ त्यामुळे आता मजीप्रासमोर योजनेचे काम मार्गी लावण्याचे आव्हान असून योजनेला मार्चर्पयत

योजनेचे काम अपूर्ण

शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला वर्ष उलटले आह़े 18 डिसेंबर 2014 रोजी या योजनेच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होत़े परंतु या एक वर्षाच्या कालावधीपैकी सहा महिने काम बंदच आह़े 60 टक्के काम आतार्पयत झाल्याचा दावा ठेकेदाराने केला असला तरी अजून 40 टक्के कामही पूर्ण झालेले नाही़ शहरातील काही भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत़ परंतु जलवाहिन्या टाकण्यासाठी वापरण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार झालेली आह़े त्यामुळे योजनेचे बंद असलेले काम सुरू करण्यापूर्वी आतार्पयत झालेल्या कामातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत़

तर दुसरीकडे कालावधी कमी असल्याने काम दुप्पट वेगाने करावे लागणार आह़े त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका:यांनी सोमवारी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांची भेट घेतली़ यापूर्वी मनपाच्या आयुक्तांच्या मागणीवरून ही योजना 27 ऑगस्ट 2015 ला मजीप्राकडे हस्तांतरित करण्यात आलेली आह़े

कागदपत्रांची केली तपासणी

पाणी योजनेच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी या समितीने केली़ दिवसभर समितीचे सदस्य मनपात उपस्थित होत़े त्यात निविदेपासून बिलांर्पयत सर्व कागदपत्रे तपासण्यात आली आहेत़ कागदपत्रे मजीप्राच्या ताब्यात दिली जाणार असून निधीदेखील वर्ग केला जाणार आह़े मजीप्राचे अधिकारी योजनेसाठी कामाला लागले आहेत़

वादळासह आव्हानांवर चर्चा

जर मार्चर्पयत मजीप्राने उर्वरित निधी खर्च केला नाही, तर हा निधी खर्च होऊ शकणार नाही़ जर हा निधी खर्च झाला नाही, तर योजनेचा पुढील हप्तादेखील मिळणार नाही. त्यामुळे ही योजना बारगळू शकत़े या योजनेसाठी मनपा अभियंता कैलास शिंदे हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत़ या योजनेत झालेले वादविवाद पाहता जर योजनेचा पुढील हप्ता मिळू शकला नाही, तर ही योजना अमृत योजनेंतर्गत पूर्ण करण्याची तयारी ठेवावी लागणार असून त्यानुषंगाने आयुक्तांनी मजीप्राच्या अधिका:यांशी चर्चा केली़ त्याचप्रमाणे योजनेच्या कामात आतार्पयत कसे वादळ आले व भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन योजनेचे काम दज्रेदार करण्याबाबतही चर्चा झाली़

समितीचा अहवाल नाहीच

पाणी योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी शहरात 10 ऑगस्टला आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परीक्षण समितीने अजूनही आपला अहवाल सादर केलेला नाही़ अहवाल मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असले तरीही अजून तो मनपास किंवा जिल्हाधिका:यांना प्राप्त झालेला नाही़ त्यामुळे 1 जानेवारीपासून योजनेच्या कामास सुरुवात केली जाणार असून प्रथम योजनेतील त्रुटींची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अहवाल आला नसताना कोणत्या त्रुटींमध्ये सुधारणा केली जाईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही़

चौकशीचे आव्हान कायम

पाणी योजनेच्या कामात झालेल्या वादविवादांची चौकशी सध्या जिल्हाधिका:यांकडून सुरू आह़े त्यानुसार योजनेतील कागदोपत्री व्यवहारांचा अहवाल जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाला सादर केला आह़े

तर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी मुंबईच्या आयआयटीशी चर्चा झाली आह़े त्यामुळे योजनेचे काम सुरू होताच आयआयटीची समितीही पाणी योजनेच्या कामांची तांत्रिक तपासणी करू शकत़े त्यामुळे मजीप्राला काम वेगाने करवून घेण्याबरोबरच त्याचा दर्जा खालावणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आह़े अन्यथा आयआयटीकडूनही पाणी योजनेच्या कामाचा पंचनामा होऊ शकतो़

डेडलाइनआह़े त्यानुषंगाने सोमवारी मजीप्राच्या टीमने आयुक्तांची भेट घेतली़

Web Title: 'Deadline' for water scheme in March!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.