दिवाळी अंधारात, रब्बीचा खर्च कसा करावा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:14 IST2019-11-05T12:09:06+5:302019-11-05T12:14:20+5:30
खरीप हंगाम पाण्यात : मेहनतीने वाढवलेल्या पीकांचे नुकसान पाहण्याची शेतकऱ्यांवर वेळ

दिवाळी अंधारात, रब्बीचा खर्च कसा करावा ?
अजय पाटील ।
जळगाव : सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम जोरदार होईल, अशा विचारात असलेल्या बळीराजाचा स्वप्नांवर २० आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने पाणी फिरवले आहे. संपुर्ण खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली. त्यामुळे आता रब्बीसाठी खर्च तरी कसा करावा ? असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे.
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी जळगाव तालुक्यातील आव्हाणे, नांदगाव, कठोरा, ममुराबाद या भाागातील शेतशिवार व बांधावर जावून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असता, अनेक शेतकºयांची शेतीच्या-शेतीवरील संपूर्ण पीक वाया गेले असून, शेतकरी कोम फुटलेल्या ज्वारी, मका व सोयाबीनच्या पीकाकडे हतबल नजरेने पाहत भविष्यात येणाºया अडचणींचा विचारात बसलेला दिसून आला. शेतीशिवारात मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकल्याचे चित्र पहायला मिळाले.
दिवाळीत ना कपडे नाही फराळ
आव्हाणे येथील दीपक मंगल पाटील या शेतकºयाचा १० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन व दादरीचे पीक पूर्ण वाया गेले आहे. चांगला हंगाम येईल अशी अपेक्षा होती, त्यामुळे घराचे बांधकाम काढले होते.
मात्र, संपुर्ण हंगामच वाया गेल्याने व घराच्या बांधकामालाही खर्च लागल्याने यंदाची दिवाळी अंधारात गेल्याची दीपक पाटील सांगतात.
आता रब्बीसाठी शेत तयार करायचे आणि पुन्हा निसर्गाने घात केला तर ..? अशी भिती मनात आहे. त्यामुळे रब्बीची लागवड करावी की नाही ? असा प्रश्न मनात येत असल्याचेही दीपक पाटील यांनी सांगितले. हेच चित्र खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा शिवारात देखील पहायला मिळाले. या पावसामुळे शेतकºयांचे पार होत्याचे नव्हते झाले आहे.
उन्हाने केळी तर पावसाने कापूसही गेला
1 आव्हाणे, खेडी शिवारात पाहणी असता आव्हाणे येथील दिलीप पंढरीनाथ चौधरी यांची ५ एकरवर लावण्यात आलेला कापूस पुर्णपणे खराब झाल्याचे दिसून आले. चौधरी यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये लागवड केलेली ६ एकरवरील केळीचे पीक जबरदस्त उन्हामुळे व ट्यूबवेल्स आटल्यामुळे संपुर्ण केळी उपटून फेकून द्यावी लागली होती. त्यानंतर ५ हेक्टरवर कापसाची तर एका हेक्टरवर उडीदची लागवड त्यांनी केली. उडीदाचे पीक बºयापैकी आले. मात्र, अवकाळी पावसामुळे कापसाचे पीक वाया गेले आहे.
2 तालुक्यातील नंदगाव येथील चंद्रकांतजिजाबराव पाटील यांच्याकडे जेमतेत साडे तीन हेक्टर जमीन आहे. त्यातही ती जमीन संपूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी त्यांनी काही भागात सोयाबीन व ज्वारीची लागवड केली होती. मात्र, पीक वाया गेले असून, खरीप हंगामातून त्यांना एकाही रुपयाचा आर्थिक फायदा होणार नसून, बियाणे, मजुरीवर लावलेला खर्चही वाया गेला आहे.
निसर्गाने साथ नाकारली, प्रशासनही ढूकंून पाहिना
निसर्गाने यंदा शेतकºयांची साथ नाकारली आहे. संपूर्र्ण पिकावर नांगर व ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकºयांवर आली असताना, प्रशासन देखील ढूंकून पहायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यातला त्यात मका, ज्वारी, दादर देखील वाया गेल्याने गुरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपुर्वी ऊन व पाण्याचा अभावामुळे गुरं विक्री करण्याची वेळ आमच्यावर आली होती, आता चाºयाअभावी गुरं पाडायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.