शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपशाविरोधात हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:27 IST

लोणी : अधिका:यांना सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने महिलांचे आंदोलन

पारोळा/ लोणी बु.।। : लोणीसीम मध्यम प्रकल्पावर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पंप ठेवून अनधिकृत पाण्याचा उपसा करीत आहेत. यावर प्रशासन कुठलीही कारवाई करीत नसल्याने लोणी बु.।।, लोणीसीम, लोणी खुर्द येथील सुमारे 70 महिलांनी संभाव्य पाणीटंचाई होण्याची चिन्हे पाहता 23 रोजी सकाळी 11 वाजता मध्यम प्रकल्पावर हंडा मोर्चा नेला.लघु सिंचन पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या लोणी मध्यम प्रकल्पावरून धुळपिंप्री, लोणी बु.।।, लोणी खुर्द, लोणीसीम, पळासखेडे, बाहुटे, फरंकाडे या गावांची पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी  हा प्रकल्प 80 टक्केच भरलेला होता. मात्र या ठिकाणाहून काही शेतकरी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे  पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठांना कळविले. तरीदेखील दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी महिलांनी मध्यम प्रकल्पावर हंडा मोर्चा काढून आंदोलन केले. यात पुरुषांनीही सहभाग घेतला होता. संभाव्य पाणीटंचाई पाहता या धरणातून होणारा पाण्याचा उपसा तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी लोणी बु.।।च्या सरपंच अनिता प्रेमराज भिल, उपसरपंच वासुदेव गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, लोणी खुर्दचे सरपंच सुरेखा गोकूळ पाटील, उपसरपंच नगराज पाटील, माजी सरपंच श्रीराम देसले आदी सहभागी झाले होते.        लोणीसीम मध्यम प्रकल्पातून अनेक गावांना पाणीपुरवठा होतो.मात्र या मध्यम प्रकल्पातून काही शेतकरी पाण्याचा अवैधरित्या उपसा करीत असल्याने पाणी टंचाईची महिलांना भीती आहे.4 या अवैधरित्या पाणी उपसाबद्दल अधिका:यांना सांगूनही काहीच कारवाई होत नसल्याने, अखेर गावातील महिलांनी या मध्यम प्रकल्पावर मोर्चा नेऊन आपला निषेध नोंदविला.