परिसरात जून महिन्यापासूनच पावसाची उत्तम सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. सुदैवाने जेव्हा पिकांची गरज असेल, त्यावेळी गरजेपुरता पाऊस पडत होता. त्यामुळे पीक परिस्थिती एकदम उत्तम होती. सुदैवाने यावर्षी कपाशी पिकावर रोगाचे प्रमाणही कमी होते. कपाशीचा हंगाम चांगलाच बहरला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली. शेतांमध्ये पाणी पाणी झाले. उभी पिके आठवडाभरात पिवळी झाली, पाने गळून पडली आहेत. मका पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मका पिकाची लागवड कमी होऊन कपाशीची लागवड जास्त प्रमाणात पाहिलेली स्वप्न धुळीला मिळाल्यामुळे बळिराजाची हिंमतच खचली आहे. गिरणा नदी परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. १५ दिवस सततच्या पावसामुळे उसाचे पीकही आडवे झाले आहे. उडीद मुगाची महिन्यापूर्वीच वाट लागली आहे.
उंबरखेड परिसरात अतिवृष्टीने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST