नऊ दिवसांपासून बंद घरात मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:28+5:302021-09-13T04:15:28+5:30

रावेर : शहरातील उटखेडा रोडलगतच्या शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेल्या महिला नऊ दिवसांपासून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे ...

Dalla was killed in a closed house for nine days | नऊ दिवसांपासून बंद घरात मारला डल्ला

नऊ दिवसांपासून बंद घरात मारला डल्ला

रावेर : शहरातील उटखेडा रोडलगतच्या शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेल्या महिला नऊ दिवसांपासून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून पुढच्या हॉलमधील लोखंडी कपाटातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील उटखेडा रोडलगतच्या शिक्षक कॉलनीतील रहिवासी नयना फत्तू तडवी या ३ ते ११ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून पुढच्या हॉलमधील लोखंडी कपाटातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना ३ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडली.

याप्रकरणी नयना फत्तू तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार विशाल सोनवणे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Dalla was killed in a closed house for nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.