दहिवदचा बेपत्ता मुलगा पुण्यात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 20:41 IST2019-09-15T20:41:16+5:302019-09-15T20:41:21+5:30
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथून बेपत्ता झालेला मुलगा पुणे येथे आढळून आला. एलसीबीच्या मदतीने अमळनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ...

दहिवदचा बेपत्ता मुलगा पुण्यात सापडला
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथून बेपत्ता झालेला मुलगा पुणे येथे आढळून आला. एलसीबीच्या मदतीने अमळनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पालकाच्या स्वाधीन केले.
दहिवद येथून १७ वर्षीय मुलगा २६ सप्टेंबर रोजी कटिंग करायला जातो, असे सांगून निघून गेला होता. त्याच्या पालकांनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक बापू रोहम, अंबादास मोरे यांनी गांभीर्याने दखल घेऊन माहिती काढली. त्यावरून मुलगा पुणे येथे असल्याचे समजले. त्यांनी तपास कामी हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे, सुनील पाटील यांना पाठवले. त्याचा शोध घेतला असता तो चिंचवड भागात भूमकर चौकात सापडला. त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.