चारचाकीचा धडकेत सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:58 IST2019-09-11T11:58:17+5:302019-09-11T11:58:41+5:30

जळगाव : रस्त्याने जाणाऱ्या पंडीत शंकर पाटील (५५, रा.शिरसोली, ता. जळगाव ) या सायकस्वाराला मागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक ...

Cyclist killed in four-wheel drive | चारचाकीचा धडकेत सायकलस्वार ठार

चारचाकीचा धडकेत सायकलस्वार ठार

जळगाव : रस्त्याने जाणाऱ्या पंडीत शंकर पाटील (५५, रा.शिरसोली, ता.जळगाव) या सायकस्वाराला मागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
पाटील हे वेल्डींग काम करतात. सोमवारी दुपारी ते पिंप्राळा येथे सायकलीने जात असताना पिंप्राळा थांब्याजवळ मागून प्रवाशी वाहतूक करणाºया चारचाकीने पाटील यांना धडक दिली.
त्याच वाहनातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली.
पाटील यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुलगा प्रवीण व शिवदास असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Cyclist killed in four-wheel drive

टॅग्स :Jalgaonजळगाव