धरणगावात उत्सुकता..... कोण होणार नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:58 IST2019-12-29T12:57:55+5:302019-12-29T12:58:49+5:30
साडे अकरा वाजेपर्यंत १७.५ टक्के मतदान

धरणगावात उत्सुकता..... कोण होणार नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान ?
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रविवार, २९ डिसेंबर रोजी मतदान होत असून सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७.५ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी कोण होणार नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान ? यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार २९ रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात येथे केवळ सात टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७.५ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत सुरू आहे.