चाळीसगाव तालुक्यातील दहिवदचा सीआरपीएफ जवान अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:35 IST2019-05-22T18:31:50+5:302019-05-22T18:35:19+5:30
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील सीआपीएफ जवान जितेंद्र चौधरी (३५) हे लातूर गावाजवळील अपघातात ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.

चाळीसगाव तालुक्यातील दहिवदचा सीआरपीएफ जवान अपघातात ठार
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील सीआपीएफ जवान जितेंद्र चौधरी (३५) हे लातूर गावाजवळील अपघातात ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.
लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवान फायरिंगसाठी जीपने चाकूरकडे येत होते. तेव्हा जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात झाला. त्यात जितेंद्र चौधरी यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे २२ मे रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी येत होते. सीआरपीएफच्या केएल-२२-बी-८३८७ क्रमांकाच्या जीपमध्ये हे जवान येत होते. त्यादरम्यान आष्टामोड जवळील रेल्वे स्थानकाच्या समोरील वळण रस्त्यावर एमएच-३८-एफ-५३३३ क्रमांकाच्या टॅÑव्हल्सने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात चालक जितेंद्र चौधरी यांचा मृत्यू झाला, तर सहाय्यक कमाडंट गंभीरसिंग यांच्या डोक्यास मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत, दुसरे जवान देशमुख हेही जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमींना लातूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.