लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 27, 2017 17:31 IST2017-01-27T17:31:00+5:302017-01-27T17:31:00+5:30
भुसावळमध्ये वीज बिल कमी करण्यासाठी चार हजारांची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 27- वीज बिल कमी करण्यासाठी चार हजारांची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. निंभोरा, तारावेर येथील लाचखोर वायरमनला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कांतीलाल गोसावी असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या घरी वायरमन गोसावी यांच्यासह अन्य चौघांनी तपासणी केली. मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरली जात असल्याचे सांगून पुढील महिन्यापासून वीज बिल कमी येण्यासाठी चार हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा जास्त वीज बिल येईल, असे सांगून त्यांनी लाच मागितली.
याप्रकरणी ग्राहकाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बसस्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी वायरमन गोसावी यांना चार हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी पोलीस उपअधीक्षक शंकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा-यांनी कारवाई केली. आरोपीविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.