भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:45 IST2017-12-13T17:43:54+5:302017-12-13T17:45:32+5:30

उघड्यावर मास विक्रीची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यामुळे दिली होती धमकी

criminal case against corporator | भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देउघड्यावर मास विक्रीची तक्रार केल्याने दिली धमकीमोबाईलवर वाईट बोलून दिली धमकीभाजपा पदाधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून नगरसेवकाविरूद्ध गुन्हा

आॅनलाईन लोकमत
यावल, दि.१३ : शहर भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणिस स्रेहल फिरके यांनी उघड्यावर मास विक्री होत असल्याची तक्रार मुख्याधिकारी यांना दिल्यावरून नगरसेवक सुधाकर धनगर यांनी त्यांना धमकी दिल्याच्या आरोपावरुन धनगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
नगरसेवक सुधाकर धनगर यांनी स्नेहल फिरके यांच्या भ्रमणध्वनीवर ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ‘तू निवेदन दिले का?, तुझी अवकात काय आहे.’ यासह वाईट बोलून धमकी दली असल्याची फिर्याद फिरके यांनी दिली. त्यावरुन भादंवि कलम ५०७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: criminal case against corporator