मानेला सुरा लावून लुटणाऱ्या गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:05 IST2020-12-23T21:05:28+5:302020-12-23T21:05:38+5:30
जळगाव : घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडण्याचा प्रयत्न करुन मानेला सुरा लावून सातशे रुपये लुटणाऱ्या मोहनसिंग जगदिशसिंग ...

मानेला सुरा लावून लुटणाऱ्या गुन्हेगारास अटक
जळगाव : घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडण्याचा प्रयत्न करुन मानेला सुरा लावून सातशे रुपये लुटणाऱ्या मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (वय १८,रा.तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री १०.३० वाजता अटक केली.
११ सप्टेबर रोजी रात्री १ वाजता भोलासिंग बावरी याने सुनीता रवींद्र हटकर (रा.तांबापुरा) यांच्या घरात घुसून सोन्याची पोत तोडण्याचा प्रयत्न केला होता तर मोहनसिंग याने उखा खंडू हटकर यांच्या मानेला सुरा लावून सातशे रुपये लुटले होते. गल्लीत दगडफेक करुन या दोघांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, याचवेळी मोनूसिंग बावरी व रिजवान उर्फ काल्या शेख हे दोघंही हद्दपार असताना येथे येऊन या दोघांसोबत दगडफेक केली होती. याप्रकरणी १२ सप्टेबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.उपनिरीक्षक गणेश कोळी यांनी बावरी याला मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.