पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:21 IST2018-12-07T16:17:26+5:302018-12-07T16:21:11+5:30
फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : तालुक्यातील फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.कॉ. महाजन व टोल नाक्यावरील कर्मचारी हे नाकाबंदी करीत असताना आरोपी शेख फिरोज शेख नासिर व नाझिम मोईउद्दीन निजामुद्दीन दोन्ही रा. वरणगाव हे दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल महाजन यांनी त्यांना थांबविले. त्यावेळी आरोपी व त्यांच्यासोबत असलेल्या कामगारांनी महाजन यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना बुधवार ५ रोजी रात्री घडली. यासंदर्भात महाजन यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.