कारागृहातून पलायन करणाऱ्या त्या कैद्याविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:40 IST2019-11-22T22:40:09+5:302019-11-22T22:40:18+5:30
जळगाव - अमळनेर येथून न्यायालयीन तारखेवरुन परत कारागृहात आल्यानंतर प्रवेशद्वारावरच पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांना ...

कारागृहातून पलायन करणाऱ्या त्या कैद्याविरूध्द गुन्हा
जळगाव- अमळनेर येथून न्यायालयीन तारखेवरुन परत कारागृहात आल्यानंतर प्रवेशद्वारावरच पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांना धमक्या देणाºया राकेश वसंत चव्हाण (२८, रा.अमळनेर) याच्याविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अमळनेर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला राकेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. दरम्यान, त्यास गुरुवारी अमळनेर न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले़ सायंकाळी त्याला कारागृहात आणले असता प्रवेशद्वाराजवळच त्याने पोलिसांच्या हाताला झटका दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पकडले़ दरम्यान, यावेळी त्याने पोलिसांची वाद घालून तुम्ही माझे कडून पाच हजार रूपये घेतल अशी खोटी तक्रार करेल अशा धमकी देऊ दिली़ त्यामुळे पोलीस संजय गोसावी यांच्या फिर्यादीवरून राकेश चव्हाण याच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़