जळगाव : जागेच्या वादावरून भाऊबंदकीमध्ये हाणामारी होऊन सहा जण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घडली.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथे शहा कुटुंबीयांची जागा आहे. शुक्रवारी आतिफ शहा भिकारी शहा (२८, रा. कासोदा, ता. एरंडोल) हे मोबाईलवर बोलत असताना ते सालदारास काही सांगत असल्याचा संशय आल्याने वादास सुरुवात झाली. त्या वेळी आतिफ शहा यांच्यासह त्यांचे भाऊ जावेद शहा भिकारी शहा (३०) व वाजिद शहा भिकारी शहा (३८), भिकारी शहा सरदार शहा (५५), जहूर शहा भिकारी शहा (३८), रईसाबी जावेद शहा (४०), सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल यांच्यात हाणामारी झाली. त्यात वरील सहाही जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कासोदा येथे जागेच्या वादावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:57 IST
सहा जण जखमी
कासोदा येथे जागेच्या वादावरून हाणामारी
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात उपचारसालदारास काही सांगत असल्याचा संशय