The 'cow' solution on the highway leads to fatalities | महामार्गावरील ‘गावठी’ उपाय ठरताय जीवघेणे
महामार्गावरील ‘गावठी’ उपाय ठरताय जीवघेणे

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या आधीच रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. तर दुसरीकडे बांभोरी ते विद्यापीठ या दरम्यान गतीरोधक टाळण्यासाठी वाहन चालक अर्धवट रूंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहन नेत आहेत. त्यांना अडविण्यासाठी गतीरोधकाच्या रांगेत दगड आणि खडीचा ढीग बनविण्यात आला असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत़
शहरातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकांत अनेक जीव जाऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले. या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. मध्यंतरी कासवगतीने रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या काम होत असल्यामुळे रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती़ नंतर कामाला गती घेत सपाटीकरणाचे काम सुरू झाले़ मात्र, हे कामही धिम्या गतीने होत असल्यामुळे गैरसोय कायम आहे.
रिफ्लेक्टर अथवा सूचना फलकाची आवश्यता
बांभोरी ते विद्यापीठ दरम्यान बनविलेल्या रस्त्यांवर सूचना फलक तसेच कुठलेही रिफ्लेक्टर लावलेले नाही़ त्यामुळे रस्त्यावर पुढे काय काम सुरू आहे याचा अंदाज येत नाही़ आधीच विद्यापीठासमोरील रस्त्यावर चढ-उतार असून मोठे खड्डे सुध्दा पडलेले आहेत. त्यामुळे रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याचे तसेच दगडांनी बनविलेले गतिरोधक काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे़
मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या या रस्त्याचे काम त्आता तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आता जनमाणसातून होऊ लागली आहे.

विद्यापीठासमोर अर्धवट गतिरोधक
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरातून हजारो विद्यार्थी शहरातून ये-जा करीत असतात, त्याचबरोबर जवळचं कंपनी असल्यामुळे त्याठिकाणी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची ये-जा असते़ आधीच चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे रस्ता काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अरूंद आहे. विद्यार्थी आणि कर्मचाºयांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो़ त्यात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील महामार्गावर शंभर ते दीडशे मीटर अंतरांवर फायबरचे दोन ते तीन गतिरोधक टाकण्यात आले आहे़ मात्र, महामार्गाच्या रूंदीइतके न टाकता अर्धवट गतिरोधक टाकण्यात आले असून त्याच्या आजू-बाजूला खड्डे आणि चढ-उतार आहे. गतीरोधक टाळण्यासाठी वाहनचालक नेमके बाजूने वाहन नेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

मुरूम, खडींनी बनविला गतिरोधक
जैन इरिगेशन कंपनीसमोरील रस्त्यावर सुध्दा खडी आणि मुरूमाचा गतिरोधक बनविण्यात आला आहे़ दरम्यान, गावठी पध्दतीने बनविलेले गतिरोधक हा फक्त खडी आणि मुरूमाचा ढिग लावून बनविण्यात आल्या असल्यामुळे त्यावरून दुचाकीधारक गेल्यास तोल जावून पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सपाटीकरण केलेल्या रस्त्यांवर गावठी पध्दतीने प्रवेश बंद करण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना या अपघाताला निमंत्रण देणाºया ठरत आहेत.

तर होवू शकतो अपघात
महामार्गावर विद्यापीठाचे फलक लावलेल्या ठिकाणी आधीच चढ-उतार असून त्यात फायबरचे गतिरोधक बनविण्यात आले़ मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात येत असल्यामुळे त्या रस्त्यावरून वाहनधारकांनी जावू नये म्हणून गतिरोधकाला लागून दगडाचे आणि खडीचे गतिरोधक बनविण्यात आले़

Web Title:  The 'cow' solution on the highway leads to fatalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.