विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:47 IST2019-11-08T21:46:51+5:302019-11-08T21:47:06+5:30

जळगाव - गुरूवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडलेल्या होत्या़ त्यातच तालुक्यातील धानवड येथे ...

Cow death due to touch of electric stars | विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू

विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू

जळगाव- गुरूवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडलेल्या होत्या़ त्यातच तालुक्यातील धानवड येथे खळवाडी विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे़
गुरुवारी सायंकाळी शहरासह तालुका भागात पावसाने हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या़ त्यामुळे तालुक्यातील धानवड येथे विद्युत प्रवाहाच्या तारा तुटून पडल्या होत्या़ वादळी वाºयामुळे जोरदार आवाज होत असल्यामुळे गावातील रामचंद्र नथू पाटील यांच्या मालकीची गाय बिथरल्यानंतर तिचा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला स्पर्श झाला़ व तिचा जागीच मृत्यू झाला़ हा प्रकार शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी संतोष सोनवणे यांनी पंचनामा केला़ त्यानंत पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली़

 

 

 

Web Title: Cow death due to touch of electric stars