लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 10:34 IST2020-12-04T10:34:11+5:302020-12-04T10:34:46+5:30
Accident news : शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता खडका चौफुलीनजीक हा अपघात झाला.

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार
भुसावळ जि.जळगाव : भरधाव डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने बुलढाणा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता खडका चौफुलीनजीक घडली.
चंद्रकांत जगन्नाथ वराडे (६५) आणि संध्या वराडे (५५) असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी ते भुसावळात आले होते.