दाम्पत्याच्या डोक्यावर बाटल्या फोडणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:55 IST2019-09-16T23:55:18+5:302019-09-16T23:55:47+5:30
जळगाव - पूर्ववेैमनस्यातून एकनाथ नगरातील वंजारी दाम्पत्याच्या डोक्यावर बियरच्या बाटल्या फोडून गंभीर जखमी केल्या प्रकरणात प्रशांत भिवराज कोळी (वय-३०, ...

दाम्पत्याच्या डोक्यावर बाटल्या फोडणाऱ्या दोघांना अटक
जळगाव- पूर्ववेैमनस्यातून एकनाथ नगरातील वंजारी दाम्पत्याच्या डोक्यावर बियरच्या बाटल्या फोडून गंभीर जखमी केल्या प्रकरणात प्रशांत भिवराज कोळी (वय-३०, रा़ जैनाबाद) व महेंद्र अशोक महाजन (वय-२३, रा़ तळेले कॉलनी) या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे़ दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
अंबादास वंजारी व त्यांच्या पत्नी सुनिता या एकनाथ नगरात वास्तव्यास असून रविवारी दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास रिक्षातून आलेल्या प्रशांत कोळी व महेंद्र महाजन यांनी वंजारी दाम्पत्याच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून गंभीर जखमी केले होते़ रविवारी रात्री पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून हल्लेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अखेर रात्रीच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील यांना संशयित हे जैनाबाद येथे असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार रात्रीच दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़