अमळनेर येथे अस्मिता सोशल ग्रुपतर्फे समुपदेशन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:55 IST2019-08-02T19:54:45+5:302019-08-02T19:55:55+5:30
अस्मिता सोशल ग्रुपतर्फे सानेगुरुजी कन्या विद्यालयात मुलींची सुरक्षेसाठी शुक्रवारी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.

अमळनेर येथे अस्मिता सोशल ग्रुपतर्फे समुपदेशन कार्यशाळा
अमळनेर, जि.जळगाव : अस्मिता सोशल ग्रुपतर्फे सानेगुरुजी कन्या विद्यालयात मुलींची सुरक्षेसाठी शुक्रवारी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.
आजच्या आधुनिक युगात युवा पिढी कितीही अग्रेसर झाली असेल तरीही सुरक्षिततेच्या दृुष्टीने मुली-स्रिया आजही १०० टक्के सुरक्षित नाहीत. आजच्या काळानुसार मुलींनी स्वत:बद्दल किती सावध आणि हिंमतवान बनायला पाहिजे या विचाराने अस्मिता सोशल ग्रुपतर्फे येथील सानेगुरुजी मुलींच्या हायस्कूलमध्ये गुड टच व बॅड टच (चांगला स्पर्श व वाईट स्पर्श) यावर जनजाग्रुतीपर समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन केले होते.
प्रमुख भाषण डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक भाषण अस्मिताच्या संचालिका विद्या हजारे यांनी केले. डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी अतिशय सोप्या सरळ भाषेत जवळजवळ १५० मुलींना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापिका अनिता बोरसे व संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनीही मुलींना उत्तमरित्या समुपदेशन केले.
याप्रसंगी अस्मिता ग्रुपच्या अध्यक्षा माधुरी पाटील, सचिव अनुपमा जैन, खजिनदार प्रतिमा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रुपच्या अन्य सदस्या जस्मिन भरुचा, अलका गोसावी, हेमा छाजेड, दीपा कटारिया, मनीषा शाह, सानेगुरुजी शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.देशमुख उपस्थित होते.